कविता, कहानी, ग़ज़ल - शायरी, गीत -लोकगीत, दोहे, भजन, हास्य - व्यंग्य, भजन आरती चालीसा प्रार्थना और एवं अन्य रचनाएं साहित्य के भंडार से

संत गोरा कुंभार के पद : Sant Gora Kumbhar Pad Rachna

संत गोरा कुंभार महाराष्ट्र के प्रसिद्ध वारकरी संत और भक्त कवि थे। उनका समय लगभग 13वीं–14वीं शताब्दी माना जाता है। उनका जन्म महाराष्ट्र के तेरढोकी गाँव में हुआ था। वे कुम्हार का काम करते थे और मिट्टी के बर्तन बनाते हुए भगवान विठ्ठल का नाम लेते थे। वे सरल जीवन, सच्ची भक्ति और अच्छे कर्म का संदेश देते थे। संत ज्ञानेश्वर और संत नामदेव जैसे संतों के साथ उनका नाम वारकरी संत परंपरा में लिया जाता है। उनकी भक्ति और सरल विचारों के कारण आज भी उन्हें श्रद्धा से याद किया जाता है।

केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं : गोरा कुंभार

केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं।
मृत्तिके माझारीं नाचतसे॥ १॥
विठ्ठलाचें नाम स्मरे वेळोवेळ।
नेत्रीं वाहे जळ सद्गसदीत॥ २॥
कुलालाचे वंशीं जन्मलें शरीर।
तो गोरा कुंभार हरिभक्त॥ ३॥

वरती करा कर दोन्ही : गोरा कुंभार

वरती करा कर दोन्ही। पताकाचे अनुसंधानीं॥ १॥
सर्व हस्त करिती वरी। गोरा लाजला अंतरीं॥ २॥
नामा म्हणे गोरोबासी। वरती करावें हस्तासी॥ ३॥
गोरा थोटा वरती करी। हस्त फुटले वरचेवरी॥ ४॥

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी : गोरा कुंभार

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी। तेणें केलें देशधडी आपणासी॥ १॥
अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें। एकलें सांडिलें निरंजनीं॥ २॥
एकत्व पाहतां अवघेंचि लटिकें। जें पाहें तितुकें रूप तुझें॥ ३॥
म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेव। तुह्मा आह्मा नांव कैचे कोण॥ ४॥

अंतरीचें गुज बोलूं ऐसें कांहीं : गोरा कुंभार

अंतरीचें गुज बोलूं ऐसें कांहीं। वर्ण व्यक्त नाहीं शब्द शून्य॥ १॥
जयजय झनकूट जयजय झनकूट। अनुहात जंगट नाद गर्जे॥ २॥
परतल्या श्रुति म्हणती नेती। त्याही नादा अंतीं स्थिर राहे॥ ३॥
म्हणे गोरा कुंभार सत्रावीचें नीर। सेवी निरंतर नामदेवा॥ ४॥

एकमेकांमाजी भाव एकविध : गोरा कुंभार

एकमेकांमाजी भाव एकविध। असे एक बोध भेदरहित॥ १॥
तूं मज ओळखी तूं मज ओळखी। मी तुज देखत आत्मवस्तु॥ २॥
आत्म वस्तु देहीं बोलता लाज वाटे। अखंडता बिघडे स्वरूपाची॥ ३॥
म्हणे गोरा कुंभार अनुभवाचा ठेवा। प्रत्यक्ष नामदेवा भेटलासी॥ ४॥

सरितेचा ओघ सागरीं आटला : गोरा कुंभार

सरितेचा ओघ सागरीं आटला। विदेही भेटला मनामन॥ १॥
कवणाचे सांगातें पुसावया कवणातें। सांगतों ऐक तें तेथें कैचें॥ २॥
नाहीं दिवस राती नाहीं कुळ याती। नाहीं माया भ्रांति अवघेची॥ ३॥
म्हणे गोराकुंभार परियेसी नामदेवा सांपडला ठेवा विश्रांतीचा॥ ४॥

निर्गुणाचें भेटी आलों सगुणासंगें : गोरा कुंभार

निर्गुणाचें भेटी आलों सगुणासंगें। तंव झालो प्रसंगीं गुणातीत॥ १॥
मज रूप नाहीं नांव सांगू काई। झाला बाई बोलूं नये॥ २॥
बोलतां आपली जिव्हा पैं खादली। खेचरी लागली पाहतां पाहतां॥ ३॥
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी। सुखासुखी मिठी पडली कैसी॥ ४॥

कैसें बोलणें कैसें चालणें : गोरा कुंभार

कैसें बोलणें कैसें चालणें। परब्रह्मीं राहणें अरे नामा॥ १॥
जेवी त्याची खूण वाढितांचि जाणे। येरा लाजिरवाणें अरे नामा॥ २॥
म्हणे गोरा कुंभार अनुभवित जाणे। आम्हांतें राशी राहाणें असे नामा॥ ३॥

मुकिया साखर चाखाया दिधली : गोरा कुंभार

मुकिया साखर चाखाया दिधली। बोलतं हे बोली बोलवेना॥ १॥
तो काय शब्द खुंटला अनुवाद। आपुला आनंद आधाराया॥ २॥
आनंदी आनंद गिळूनि राहणें। अखंडित होणें न होतिया॥ ३॥
म्हणे गोरा कुंभार जीवन्मुक्त होणें। जग हें करणें शहाणें बापा॥ ४॥

कवण स्तुति करूं कवणिया वाचे : गोरा कुंभार

कवण स्तुति करूं कवणिया वाचे। ओघ संकल्पाचे गिळिलें चित्तें॥ १॥
मन हें झालें मुकें मन हें झालें मुकें। अनुभवाचें हें सुखें हेलावलें॥ २॥
दृष्टीचें पहाणें परतले मागुती। राहिली निवांत नेत्रपाती॥ ३॥
म्हणे गोरा कुंभार मौन्य सुख घ्यावें। जीवें ओवाळावें नामयासी॥ ४॥

काया वाचा मन एकविध करी : गोरा कुंभार

काया वाचा मन एकविध करी। एक देह धरी नित्य सुख॥ १॥
अनेकत्व सांडीं अनेकत्व सांडीं। आहे तें ब्रह्मांडीं रूप तुझें॥ २॥
निर्वासना बुद्धि असतां एकपणें। सहज भोगणें ऐक्य राज्य॥ ३॥
म्हणे गोरा कुंभार नाहीं रूप रेख। तेंचि तुझें सुख नामदेवा॥ ४॥

स्थूल होतें तें सुक्ष्म पैं झालें : गोरा कुंभार

स्थूल होतें तें सुक्ष्म पैं झालें। मन हें बुडालें महासुखीं॥ १॥
माझें रूप माझें विरालेसें डोळां। माझें ज्ञान सामाविलें माझें बुबुळां॥ २॥
म्हणे गोरा कुंभार नवल झालें नाम्या। भेटी तुह्मां आह्मां उरली नाहीं॥ ३॥

केशवाचे भेटी लागलें पिसें : गोरा कुंभार

केशवाचे भेटी लागलें पिसें। विसरलें कैसें देहभान॥ १॥
झाली झडपणी झाली झडपणी। संचरलें मनीं आधीं रूप॥ २॥
न लिंपेची कर्मीं न लिंपेची धर्मी। न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा॥ ३॥
म्हणे गोरा कुंभार सहज जीवन्मुक्त। सुखरूप अद्वैत नामदेव॥ ४॥

वंदावे कवणासी निंदावें कवणासी : गोरा कुंभार

वंदावे कवणासी निंदावें कवणासी। लिंपावें गगनासी कवण लिंपी॥ १॥
नाहीं जया रूप नाहीं जया ठाव। तेंचि व्यालें सर्व सांगतसे॥ २॥
जीवनीं चंद्रबिंब विंबलें पैं साचें। परि नाहीं तें नितंबिलें जवळें जेवीं॥ ३॥
म्हणे गोरा कुंभार नामया जीवलगा। आलिंगन देगा मायबापा॥ ४॥

नामा ऐसें नाम तुझिया स्वरूपा : गोरा कुंभार

नामा ऐसें नाम तुझिया स्वरूपा। आवरण आरूपा कोण ठेवी॥ १॥
तूं गुह्य चैतन्य नित्य वस्तु जाण। रहित कारण स्वयंप्रकाश॥ २॥
याही शब्दामाजी वाचा न लागे। मार्ग पैं गा लागे निर्धारिता॥ ३॥
म्हणे गोरा कुंभार आत्मया नामदेवा। चिद्रूप अवघा दिससी साच॥ ४॥

कायसास बहु घालिसील माळ : गोरा कुंभार

कायसास बहु घालिसील माळ। तुज येणेविण काय काज॥ १॥
एकपणें एक एकपणें एक। एकाचें अनेक विस्तारिलें॥ २॥
एकत्व पाहतां शिणलें धरणीधर। न चुके येरझारा संसाराची॥ ३॥
म्हणे गोरा कुंभार कोणी नाहीं दुजें। विश्वरूप तुझें नामदेवा॥ ४॥

देवा तुझा मी कुंभार : गोरा कुंभार

देवा तुझा मी कुंभार। नासीं पापाचें डोंगर॥ १॥
ऐशा संतप्ते हो जाती। घडे साधूची संगती॥ २॥
पूर्ण कृपा भगवंताची। गोरा कुंभार मागे हेंचि॥ ३॥

श्रवणें नयन जिव्हा शुद्ध करी : गोरा कुंभार

श्रवणें नयन जिव्हा शुद्ध करी। हरीनामें सोहंकारी सर्व काम॥ १॥
मग तुझा तूंचि दिवटा होसीगा सुभटा। मग जासील वैकुंठा हरिपाठें॥ २॥
रामनामें गणिका तरली अधम। अजामिळ परम चांडाळ दोषी॥ ३॥
म्हणे गोरा कुंभार विठ्ठल मंत्र सोपा। एक वेळा बापा उच्चारीरे॥ ४॥

रोहिदासा शिवराईसाठी : गोरा कुंभार

रोहिदासा शिवराईसाठी। दिली पुंडलिका भेटी॥ १॥
पुंडलिका झाला अनुताप। धन्य सत्य गुरु माय बाप॥ २॥
जन्मा येऊनियां काय केली करणी। व्यर्थ शिणविली जननी॥ ३॥
नऊ महिने ओझें वागऊन। नाहीं गेला तिचा शीण॥ ४॥
ऐसा झालो अपराधी। क्षमा करा कृपानिधी॥ ५॥
ऐसा पुंडलिका भाव। उभा केला पंढरीराव॥ ६॥
भक्त पुंडलिकासाठी। उभा भिंवरेच्या तटी॥ ७॥
कटावरी ठेवूनी कर। उभा विटेवरी नीट॥ ८॥
ऐसा भाव धीर म्हणे गोरा। तीर्था जा फजितखोरा॥ ९॥

निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी : गोरा कुंभार

निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी। विठ्ठल निवृत्ति प्रवृत्ति दिसे॥ १॥
एक पुंडलिक जाणे तेथील पंथ। तुझा आम्हां चित्त भाग्य योगें॥ २॥
सभाग्य विरळे नामा पाठीं गेले। अभागी ते ठेले मौन्यजप॥ ३॥
म्हणे गोरा कुंभार नामया भोगितां उरल्या उचिता सेवूं सुखें॥ ४॥

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Popular Posts

Categories

संपर्क फ़ॉर्म

नाम

ईमेल *

संदेश *